शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुकर’च्या १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा अखेर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST

फैजपूर, ता. यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकविल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल ...

फैजपूर, ता. यावल : शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट थकविल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल होती व त्यांच्या आदेशान्वये कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव पार पडला. या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत आठ विविध एजन्सींनी भाग घेतला होता. यात एमकेसीएल या कंपनीने २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ रुपयांत करविरहित लिलाव घेतला. आता येत्या ४५ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूूर्ण होत सर्व रक्कम न्यायालयात जमा केली जाणार आहे. यातून प्राधान्याने शेतकऱ्यांची व अन्य देणी चुकती होणे अपेक्षित आहे. या व्यवहारामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या दोन वर्षांपासून अडचणी वाढल्या आहेत. कारखान्याकडे ऊस गाळप हंगाम २०१८/१९ मधील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे देयक रक्कम व त्या रकमेवर १५ टक्क्याप्रमाणे १५ कोटी ८० लाख रुपये थकीत होते. सन २०१८/१९ मध्ये राज्य शासनाकडून वेळीच थकहमी न मिळाल्याने जिल्हा बँकेकडून ऊस पुरवठादार शेतकऱ्याचे पेमेंट अदा करण्यासाठीचे कर्ज मिळू शकले नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली होती. या थकीत रकमेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन १४४५४ हे २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेे होते. न्यायालयाने साखर आयुक्त पुणे यांनी महसूल विभागास जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्यात उपलब्ध साठा जप्त करावा, असे आदेश गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिले होते.

कोरोनाकाळात या निकालावर अपील प्रक्रिया पूर्ण झाली. आता नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने मधुकर सहकारी साखर कारखान्यातील १ लाख १४ हजार क्विंटल साखरेचा लिलाव करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार संचालक मंडळाकडून सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करीत मंगळवारी ऑनलाइन लिलाव पार पडला व यात एमकेसीएल कंपनीने हा लिलाव २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ रुपयांत करविरहित घेतला.

पैसे न्यायालयात जमा करणार

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लिलाव पूर्ण झाला व आता ४५ दिवसांत संपूर्ण साखर उचल प्रक्रिया पूर्ण होत लिलावाची रक्कम प्राप्त होईल व ती संपूर्ण रक्कम २९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ न्यायालयात जमा केली जाईल.

उर्वरित रकमेचा न्यायालय घेणार निर्णय

२९ कोटी ६९ लाख ८२ हजार ४४१ या लिलाव रकमेतून १५ कोटी ८० लाख शेतकऱ्यांची देणी आहे. कामगारांकरिता १६ कोटी अपेक्षित आहेत, तर बँकांचे सुमारे ५५ कोटींचे कर्जदेखील थकले आहे. तेव्हा उर्वरित रक्कम कोणास द्यावी याबाबत न्यायालय निर्णय घेऊ शकते.

कोट

कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा होणार

कामगारांचे थकीत वेतन दिले गेले पाहिजे व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या उद्देशाने संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. ती प्रक्रियादेखील लवकरच पूर्ण होत येत्या हंगामात कारखाना सुरू होणे अपेक्षित आहे.

- शरद महाजन, चेअरमन, मसाका