शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा- हातेड रस्त्यावर ट्रक अपघातात १ ठार, १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:09 IST

मोटरसायलला दिली धडक : रस्त्याच्या बाजुला ट्रकही उलटला

चोपडा : अंकलेश्वर- बºहाणपूर महामार्गावर चोपडा- हातेड दरम्यान काजीपुरा फाट्याजवळ मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास ठोस दिली यात ट्रक उलटून १८ मजूर जखमी झाले तर दुचाकीस्वार जागीच ठार झाला.हा अपघात १ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान झाला. किनगाव ता. चोपडा येथुन लासुर ता.चोपडा येथे कांदे भरण्यासाठी मजूर व कट्टे घेऊन जात असतान एम. एच. १९/ बी. एम. ८०८ या ट्रकची समोरून येणाºया एम. पी. ४६ /एम.एम. ३७३१ या क्रमांकाच्या दुचाकीस धडक बसून ट्रक उलटला. या अपघातात दुचाकीस्वार मंसाराम डोंगरसिंग बारेला (वय ३२) रा. दुगानी ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच यातील गंभीर जखमी इर्शाद हमीद तडवी (१९) , नूरजहाँ हमीद तडवी (४८) , हमीदाबी रमजान तडवी (४५), हमीदा रमजान तडवी (४२), बैतूलबी सुभान तडवी (४५), लुकमान अरमान तडवी (२५), यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आली तर अझरुद्दीन हमीद तडवी (१८) , गोपाल दगडू महाजन (२५) किनगाव, सिमरन सुपडू तडवी (१४), राजू सिकंदर तडवी (२२), खातूनबी रहेमान तडवी (६०), हमीदा नत्थु तडवी (३४), साहिल सुपडू तडवी (१८), मेहमूदाबी नथ्थु तडवी (४०), ऐनूरबी कलिंदर तडवी (५०), शाहिद शरद तडवी (१९), शेखर गंभीर तडवी (२३), खातूनबी सायबू तडवी (२५) या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथे डॉ. पंकज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ व डॉ. सपना पाटील यांनी उपचार केले.याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय मनीलाल देवराज रा. किनगाव यांच्या फियार्दीवरून वाहन चालक उत्तमसिंग जयसिंग पवार रा. फोपणार ता. बºहाणपूर, हल्ली मुक्काम कुसुंबा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार काशिनाथ पाटील हे करीत आहे.