शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बजेट शेतीसाठी दुग्धव्यवसाय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:44 IST

झिरो बजेट शेतीचा व्यवसाय करण्यासाठी त्याला जोड म्हणून दुग्धव्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : झिरो बजेट शेतीचा व्यवसाय करण्यासाठी त्याला जोड म्हणून दुग्धव्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पशुसंर्वधन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी भोकरदन येथील गोशाळेला भेट दिल्यानंतर व्यक्त केले.राज्यात भेसळयुक्त दूध विक्री मोठ्या प्रमणात होत असून, मुंबईसह शहरी भागात येणारे दुधाचे टँकर तपासण्याचा अधिकार आमच्या खात्याला देण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लवकरच तो अधिकार आमच्या विभागाला मिळणार आहे. असे असले तरी आपल्या महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण झिरो बजेट शेती करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी गायी संभाळाव्या व त्यापासून निघणारे गोमूत्र व शेण यांच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पादन निघते. शिवाय दर्जेदार दूधसुध्दा मिळते, असे सांगून शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा जोडधंदा करावा, असे सांगितले. यावेळी पंडित भुतेकर, रमेश गव्हाड, मनिष श्रीवास्तव, नवनाथ दौड, कैलास पुंगळे, माधवराव हिवाळे, सुरेश तळेकर, महेश पुरोहित, रामेश्वर जंजाळ, दिलीप ओस्तवाल, भूषण शर्मा आदी उपस्थित होते़ यावेळी गोशाळेच्या वतीने दिलीप ओस्तवाल व नितीन ओस्तवाल यांनी खोतकर यांचे स्वागत केले़भोकरदन-सिल्लोड रोडवरील गौशाळेला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. यावेळी जयगुरू गणेश जय गुरूमिस्त्री गोरक्षण चारिटेबल ट्रस्टच्या वतीने २०० ते ३०० जनावरांची ही अत्यंत आधुनिक गोशाळा सुरू केल्याबद्दल संस्थाध्यक्ष नितीन ओस्तवाल व दिलीप ओस्तवाल यांचा गौरव केला. या गौशाळेला आपण राज्यशासन व पक्षाच्या वतीने मोफत चारा पुरवठा करू, असे सांगून या ठिकाणी जनावरांसाठी वैद्यकीय सेवा तात्काळ देण्याबाबत त्यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाºयांना आदेश दिले. शिवाय दुष्काळी परिस्थितीत या ठिकाणी पाणी व चारा देण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाAgriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकर