पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा) : सैलानी येथून १६ वर्षीय बालिकेला मोटार सायकलवरुन पळून नेणार्या अशोक सदाशिव पवार (वय २२) रा.सेलू जिल्हा परभणी याला जालन्यात अटक करण्यात आली. सेलू जि.परभणी येथील अल्पवयीन मुलगी आईसोबत वडीलांवर उपचार करण्यासाठी सैलानी येथे आली होती. या मुलीस अशोक पवारने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जालना येथे अशोकला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३६३, ३६६ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या तरुणाला अटक
By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST