शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे कर्ज झाले माफ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:18 IST

आपल्या खात्यावरील कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे’, असे संदेश शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त होत आहेत.

जालना : ‘महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत निकषांच्या आधारे बँकेतील आपल्या खात्यावरील कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे’, असे संदेश शेतक-यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ६१ शेतक-यांचे ६५७ कोटी ३० लाख, ५१ हजार शेतक-यांचे कर्ज आतापर्यंत माफ करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या २७ हजार ७३९ शेतक-यांचा यात समावेश आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतक-यांना आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी कर्जमाफी मिळावी यासाठी आपले सरकार वेबपोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केली होती. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या थकित कर्जदार असलेल्या तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाइन अपडेट केली होती. सुरुवातीलच्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया बराच काळ रेंगाळल्यामुळे कर्जमाफी कधी मिळेल, याची चिंता शेतक-यांना लागून होती. परंतु आता कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ग्रीन यादीत सहा हजार १५५ शेतक-यांना ५१ कोटी ४६ लाख ११ हजार, दुस-या ग्रीन यादीमध्ये ६५ हजार ७४९ शेतक-यांना ४०९ कोटी ८२ लाख आणि तिसºया ग्रीन यादीत ५० हजार १५७ शेतक-यांसाठी १९६ कोटी दोन लाख चार हजार रुपये विविध राष्ट्रीयीकृत बँकांना प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार असलेल्या ९४ हजार ३२२ शेतक-यांना ६२६ कोटी १५ लाख ५१ हजार रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २७ हजार ७३९ शेतक-यांना ३१ कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.दरम्यान, कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेअंतर्गत २१४३ पैकी ७६४ खातेदारांचे ६ कोटी ८० लाख रक्कम कर्ज खातेदाराच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती शाखा व्यवस्थापक जी.पी.गायकवाड यांनी दिली. बँकेच्या पहिल्या टप्प्यात १०६ खातेदारांना १ कोटी ७ लाख तर दुस-या टप्प्यात ५६४ खातेदारांचे ५ कोटी ७३ लाख रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली तर तिस-या टप्प्यात येत्या दोन दिवसांत रक्कम खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.