शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे आलेला तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:50 IST

आजोबांच्या दहाव्यासाठी गावी आलेला तरुण जोगलादेवी बंधा-यात बुडाला आहे. मंगळवारी दिवसभर शोधकार्य करूनही पोलीस व अग्निशमन दलाच्या हाती काहीच लागले नाही.

तीर्थपुरी : आजोबांच्या दहाव्यासाठी गावी आलेला तरुण जोगलादेवी बंधा-यात बुडाला आहे. मंगळवारी दिवसभर शोधकार्य करूनही पोलीस व अग्निशमन दलाच्या हाती काहीच लागले नाही. रात्री उशिरापर्यंत पाणबुडीच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.संतोष लक्ष्मण खोजे (३१, रा. जोगलादेवी) असे या तरुणाचे नाव आहे. संतोष सध्या आळंदी येथे नोकरीनिमित्त कुटुंबियांसोबत राहत होता. आजोबा ज्ञानदेव खोजे यांचे १५ जानेवारीला निधन झाल्यामुळे तो दहाव्याच्या कार्यक्रमासाठी २१ जानेवारीला गावाकडे आला होता. सोमवारी रात्री घरी इतरही पाहुणे आलेले होते. संतोषच्या आईने त्यास पाहुण्यांसोबत जेवून घेण्याचे सांगितले. मात्र लघुशंकेला जाऊन येतो म्हणून तो चप्पल घालून घराबाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी नातेवाइकांनी संतोषचा सर्वत्र शोध सुरू केला. गावालगत असलेल्या जोगलादेवी बंधा-यावर त्याच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी तीर्थपुरी पोलीस चौकीत माहिती दिली. माहिती मिळताच कॉन्स्टेबल बी.के. हवाले, बी. व्ही. शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ समर्थ कारखान्याचे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी बोलावले. अग्निशामक दलाचे एफ. आर. बुनगे यांनी जवानांच्या मदतीने बारा हजार लिटर पाणी अतिउच्च दाबाने पाईपच्या मदतीने बंधाºयात सोडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वर आली. मात्र, संतोषचा शोध लागला नाही. बंधा-यावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा परतूर येथून आलेल्या पाणबोटीच्या मदतीने जोगलादेवी बंधा-यात शोधकार्य सुरू होते.