नेताजी सुभाषचंद्र बोस सेना, जालना
जालना : नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या वतीने भक्तेश्वर नगर येथे आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मयुर गोफणे, विकी हिवाळे, ज्ञानेश्वर घाटोळे, राहुल मुळे, विष्णू जाधव, दीपक हिवाळे, आकाश सपकाळ, आकाश लोखंडे, बाळू कांबळे, सुभाष घाटोळे, रतन कांबळे, नितीन लांडगे, संतोष घोरपडे, हारी निकाळजे, शंकर भागडे आदींची उपस्थिती होती.
राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट, ब्रम्हपुरी
जाफराबाद : तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा छाया शेवत्रे, सचिव शशिकला केवट, गजानन शेवत्रे, पंढरी शेवत्रे, गजानन नानगुडे, रमेश पठाडे, रामेश्वर केवट आदींची उपस्थिती होती.
फोटो
श्री वसंतदादा देशमुख बी.ए. महाविद्यालय, पिंपळगाव
पिंपळगाव रेणुकाई : येथील श्री वसंतदादा देशमुख महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी वसंतराव देशमुख, प्राचार्य व्ही.आर. देशमुख, ज्येष्ठ नागरिक दिगंबर देशमुख, प्रा. आर.बी. देशमुख, प्रा. आर.आर. सोनुने, अरविंद देशमुख, व्ही. जी. देशमुख यांच्यासह कर्मचाºयांची उपस्थिती होती.
फोटो
श्री गणपती इंग्लिश, मराठी हायस्कूल, भोकरदन
भोकरदन : येथील श्री गणपती इंग्लिश / मराठी हायस्कूल जोमाळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख म्हणाल्या की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागे जशी महात्मा ज्योतिराव फुले यांची खंबीर साथ होती. तशीच खंबीर साथ माझे पती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची मला आहे. त्यामुळे मी भोकरदन नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. आज प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरूषाची साथ असते. त्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरपरिषदेच्या बांधकाम सभापतीपदी गयाबाई जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते, प्राचार्य बी.एम. तांबारे, मुख्याध्यापक पी.बी. रोजेकर, लता गायके, रमेश जाधव, पर्यवेक्षक जी.व्ही. जाधव, गजानन बुलगे आदींची उपस्थिती होती.