शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एकापेक्षा एक अप्सरा : लावणी कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:07 IST

महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण लोकमत सखी मंच आयोजित एकापेक्षा एक अप्सरा लावणी कार्यक्रमात पहायला मिळाले.

जालना : महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण लोकमत सखी मंच आयोजित एकापेक्षा एक अप्सरा लावणी कार्यक्रमात पहायला मिळाले.जालना येथील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी रंगलेला हा लावणी धमाका पाहून महिला भारावल्या अन लावणीच्या तालावर मुक्तपणे थिरकल्याही. कित्येक वर्षे महाराष्ट्रातील महिलांना लावणी ही कला अनुभवता, पाहता येत नव्हती. पण आपल्या सखींनाही या कलेचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी सखी मंचने पुढाकार घेऊन मागील काही वर्षापासून दरवर्षी लावणी कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला सखींचा वाढताच प्रतिसाद मिळत गेला. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमालाही सखींनी तुफान गर्दी केली होती. बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा... या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यानंतर कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.. ही गवळण सादर करून नृत्यांगनांनी श्रीकृष्णाची आठवण करून दिली. हळू हळू वातावरणातील गारवा वाढत गेला आणि लावणी अधिकाधिक रंजक बनत गेली. ‘दिलबरा करते तुला मुजरा..’ ही लावणी सादर करण्यासाठी साधना पुणेकर यांनी रंगमंचावर प्रवेश करताच सखींनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. या रावजी, बसा भावजी.. ही लोकप्रिय लावणी साधना यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत सादर करून सखींची मने जिंकली.ईचार काय हाय तुमचा.. या लावणीला सुरूवात होताच अनेक सखींनी आपल्या जागा सोडल्या आणि थेट रंगमंच गाठला. रंगमंचावर अनेक सखींनी नृत्यांगनासोबत थिरकण्याचा आनंद लुटला. सखींचा मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद नृत्यांगनांनाही नवा उत्साह देणारा ठरला. कारभारी दमानं, लाडाची गं लाडाची, कैरी पाडाची.. अशा लोकप्रिय लावण्या सखींना तालावर थिरकण्यास भाग पाडत होत्या.निवेदक नवनाथ भोसले यांनीही गं सजणी... यासारखी लोकप्रिय गाणी गाऊन सखींचे मनोरंजन केले. सोडा सोडा राया हा नाद खुळा.., तुम्हावर केली मी मर्जी बहाल.. यासारख्या लोकप्रिय लावण्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढविली.शनिवारी नाटकाचे आयोजनलावणीच्या धमाक्यानंतर शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) सायं. ५.३० वा. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात चोरीचा मामला या हास्याचा खळखळाट फुलविणाºया नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ सखी मंच सदस्यांसाठीच असल्यामुळे येताना २०१८ चे ओळखपत्र सोबत घेऊन यावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी ३ वाजेपासून सखी मंच सदस्य नोंदणी करता येईल. तसेच शहरातील विविध केंद्रावर व लोकमत कार्यालय, गीता कॉम्पलेक्स, भोकरदन नाका, जालना येथे सदस्यता नोंदणी करता येईल.