जामखेड- जाेगेश्वरी रस्ता कामाची पाहणी
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड ते जोगेश्वरी रस्ता कामाची आमदार नारायण कुचे यांनी पाहणी केली. आमदार कुचे यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, सरपंच सचिन जाधव, पंकज मंडलिक, डॉ. गंगाधर पांढरे, बबन म्हस्के, अण्णासाहेब जाधव, विलास राठोड यांची उपस्थिती होती.
पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी करा
मंठा : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून, बंजारा समाजाची बदनामी होत आहे. या प्रकरणात बंजारा समाजाची होणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नेत्रा ग्रुपचे संचालक जगदीश राठोड यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही जगदीश राठोड यांनी केली आहे.
चापनेर गावामध्ये शिवव्याख्यान कार्यक्रम
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथील शिवव्याख्यान कार्यक्रमात अक्षय लोखंडे यांनी विविध विषयांवर समाज प्रबोधन केले. यावेळी शिवाजी पवार, बालाजी पवार, दिनेश लक्कस, विकास लोखंडे, विजय तबदे, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. योगेश लोखंडे, गजानन सुरासे, दादाराव पवार, भगवान काळे, भागवत काळे, नंदकिशोर अवकाळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
पशुवैद्यकीयची रिक्तपदे भरण्याची मागणी
अंबड : पशुपालक, शेतकऱ्यांच्या शेतातच पशुधनावर उपचार करावेत, पशुवैद्यकीय विभागातील रिक्तपदे भरावीत, पशुंसाठी असलेल्या योजनांची जनजागृती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, अनेकवेळा खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार घ्यावे लागत आहेत.