भोकरदन : ग्राम साखळी (जि. बुलडाणा) येथे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीला झालेल्या अपघातात आन्वा पाडा येथील एका महिला ग्रा.पं. सदस्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास माळवंडी जवळ घडली. अनिता गणेश सोनुने असे मयत महिलेचे नाव आहे.
आन्वा पाडा येथील गणेश सोनुने व त्यांची पत्नी अनिता सोनुने हे दोघे दुचाकीने सोमवारी ग्राम साखळी (ता. बुलडाणा) येथे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी जात होते. माळवंडीजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात दोन्ही पती पत्नी जखमी झाले होते. अनिता सोनुने यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.