शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंगणवाड्या इमारतीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:39 IST

जिल्ह्यातील १ हजार ९४६ अंगणवाड्यांपैंकी तब्बल ५४३ अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत उभारता आलेली नाही.

ठळक मुद्देजालना : ५४३ अंगणवाड्या भरतात पारावर तर कुठेकुठे मंदिरात

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील १ हजार ९४६ अंगणवाड्यांपैंकी तब्बल ५४३ अंगणवाड्यांना स्वत: ची इमारत उभारता आलेली नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, जि. प. शाळांच्या व्हरांड्यात भरतात, विशेष म्हणजे, यापैंकी ५४ अंगणवाड्या तर कुठे पारावर -मंदिरात भरवल्या जात आहेत.अंगणवाड्यांच्या माध्यमातून ६ वर्षांपर्यंत बालकांना लसीकरण, पोषण आहार, आरोग्याच्या संदर्भ सेवा तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण व बाल संस्कराचे धडे दिले जातात. अलीकडे तीव्र कुपोषित बालकांसाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. जवळपास ५०० अंगणवाड्यांमध्ये या केंद्रांच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण आहार दिला जातो. त्यांच्यावर अंगणवाडी कार्यकर्ती- मदतनिसांच्या निगराणीत आरोग्य सेवा दिली जाते. आपल्या दर्जेदार सेवेच्या माध्यामातून जिल्ह्यात ८७ अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकनही पटकावले आहे. मात्र, असे असले तरी अजूनही ५४३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे त्यांची घुसमट चालू आहे. यातील २१४ अंगवाड्या शाळेच्या इमारतीत, ६४ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात, १६४ इतर ठिकाणी भरतात.तर दुसरीकडे जालना तालुक्यातील ५, बदनापूर तालुक्यातील ६, अंबड तालुक्यातील १९, घनसावंगी तालुक्यातील ७, परतूर तालुक्यातील ७, मंठा तालुक्यातील १, भोकरदन तालुक्यातील ६, जाफराबाद तालुक्यातील ३ असे एकूण ५४ अंगणवाड्या उघड्यावर भरतात. यासंर्दभात जि.प.चे महिला व बालकल्याण अधिकारी यु. एस. खरात यांना दुरध्वनीवरून संर्पक केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मंठा शहरातील जि.प. शाळेच्या आवरामधील अंगणवाडीच्या परिसरात अस्वच्छता आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे महिला व बालकल्याण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.धोकादायक अंगणवाडीजिल्ह्यात अनेक अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. काही अंगणवाड्यांच्या छताचे पोपडे कोसळले आहेत, तर काही अंगणवाड्यांच्या भिंती, फरशा खचल्या आहेत.आरोग्यास धोकाजिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांच्या परिसरात अस्वच्छता आहे. या अंगणवाड्याजवळ घाणीचे सामाज्य परसरले आहे. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.लक्ष देण्याची गरजसरकारकडून अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. परंतु, या निधींचा अधिकारी उपयोग करतांना दिसत नाही. त्यामुळे अंगणवाड्याची बक्कास अवस्था झाली आहे.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र