शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रयतेच्या डोळ्यात स्वत:ला पाहणारा जाणता राजा : शिवाजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

देऊळगावराजा : हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. ...

देऊळगावराजा : हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने काही निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जाणार आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तर तारखेनुसार शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. यादिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

शिवजयंतीप्रमाणेच शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल दोन गटांमध्ये मतभेद आहेत. यातील एक गट ६ जून रोजी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात, तर काही जण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी साजरा करतात. यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी, ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतात. यादिवशी शिवप्रेमी एकमेकांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. अठरा जातींना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शेतकरी, महिलांचे हित आणि त्यांचा सन्मान करण्याचा ध्यास घेऊन तो त्यांनी प्रत्यक्षात उतरविला. त्या काळात पाणीव्यवस्थापन कसे असावे. याबद्दलही त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक कामे केली आहेत. त्यामुळे शिवकालीन पाणीपुरवठा ही योजना आजही तेवढीच त्या- त्या किल्ल्यांवर गेल्यानंतर दिसून येते.

राज्य सरकारने राज्यातील सर्व प्रमुख किल्ल्यांचे संरक्षण आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीची योजना मंजूर करून त्याचे कामही सुरू झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या गड -किल्ल्यांमधून त्या काळातील वैभव आणि तेथील संरक्षणाची तटबंदी कशी होती, हे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच दिसून येते. त्यामुळे अनेक शिवप्रेमी आता पर्यटनासाठी अन्य शहरांमध्ये जाण्याऐवजी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांना भेट देत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारनेदेखील आता विशेष योजना जाहीर केल्याने आगामी काळात गड-किल्ले हे अधिक काळ टिकून नवीन पिढीला इतिहासाची प्रेरणा देतील. यात शंका घेण्याचे कारण नाही. शिवाजी महाराजांचे आजोळ हे सिंदखेडराजा येथील असल्याने त्यांचा आणि या परिसराचे एक भावनिक नाते जुळले होते. तो इतिहास आजही तेवढ्याच आत्मीयतेने अभ्यासला जातो. शिवाजी महाराजांची राज्य चालविण्याची पद्धत आणि त्यांची युद्ध नीती ही के‌वळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर अभ्यासली गेली.