रविवारी जालना येथे शिक्षण सेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मराठवाडा प्रहार शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष राजगुरू, प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दांडगे, बालाजी माने, आकाश नरवाडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजगुरू म्हणाले की, शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीसाठी प्रहार शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला आहे. याविषयी मंत्रालयामध्येही प्रहार संघटनेमार्फत बैठक घेतल्या गेल्या आहेत. शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीसह प्रसूती रजा, अर्जित रजा यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन अमोल शिंगणे तर आभार सुनील सरकटे यांनी मानले. या मेळाव्यात रवी माळी, जया चिरडे, आशिष देवतळे यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी पवन कुमार वानखेडे, गौतम वानखडे, अविनाश तायडे, वर्षा रेवतकर, सुप्रिया कांबळे, दीपाली खैरे, राजपाल डोंगरदिवे, आकाश बिजवे, नितेश बोरकर, नागुलकर सर, शिल्पा सावळे आदींची उपस्थिती होती.