शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

व्हाइट कॉलर गुन्हेगार मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

जालना : नागरिकांची फसवणूक झालेल्या ८ पैकी ७ प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासवगतीने होत आहे. यात व्हाइट कॉलर ...

जालना : नागरिकांची फसवणूक झालेल्या ८ पैकी ७ प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासवगतीने होत आहे. यात व्हाइट कॉलर आरोपी असल्यामुळे ते सापडत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीच सापडले नसल्यामुळे २०२० मध्ये ८ पैकी एका गुन्ह्याचे दोषारोपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असल्यास त्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट करतात. २०२० मध्ये जालना जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविलेल्या गुन्ह्यांपैकी ८ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असतात. मोठ्या रकमेची फसवणूक करणारे आरोपीही व्हाइट कॉलर असतात, अशा आरोपींना अटक करणे, फसवणूक करून मिळविलेल्या पैशांतून आरोपींनी संपत्ती खरेदी केली असेल, तर ती संपत्ती जप्त करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणे, बँक खाती गोठविणे, आरोपींविरुद्ध तपास करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल करणे, हे आर्थिक गुन्हे शाखेकडून केले जाते, परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडून बहुतेक गुन्ह्यांचा तपास कासवगतीने केला जात असल्याचे दिसून येत आहे.

चौकट

माझ्याकडे आठ दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार आला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास अत्यंत किचकट असतो. या गुन्ह्यात कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचा अभिप्राय द्यावा लागतो. यामुळे दोषारोपत्र दाखल करण्यास उशीर होतो.

शालिनी नाईक, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना

मैत्रीचा घोटाळा गाजला

नागरिकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून मैत्री या कंपनीने २०१६ मध्ये जिल्ह्यातील तब्बल १३ हजार नागरिकांची फसवणूक केली होती. हा घोटाळा तब्बल २४ करोड रुपयांचा असून, यातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही.

ढोकेश्वर संस्थेकडून फसवणूक

जालना शहरातील ढोकेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने तब्बल २३ जणांची फसवणूक केली होती. जवळपास २३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली होती. यातील आरोपीही मोकाटच असल्याचे पोलिसांनी सांगितले.