शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे खिडक्या तुटल्या, तर कुठे छताला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

दीपक ढोले जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिली जातात ; परंतु, या ...

दीपक ढोले

जालना : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे शासकीय निवासस्थाने दिली जातात ; परंतु, या निवासस्थानांची मागील काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. कुठे खिडक्या तुटल्या तर कुठे छताला गळती असल्याने अधिकारी व कर्मचारी किरायाच्या घरात राहत आहे. चांगल्या स्थितीत असलेल्या ८१४ पैकी केवळ ४०० घरांमध्येच पोलीस राहत असल्याचे दिसून येत आहे.

दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जालना जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस ठाणे व शहराच्या ठिकाणी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. जालना शहरातील रामनगर परिसर व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे १९५४ साली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. तेव्हापासून या निवासस्थानांची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे आता ही निवासस्थाने मोडकळीस आली असून, याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष आहे. निवासस्थानांच्या खिडक्या तुडल्या आहेत. तर कुठे छताला गळती लागली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी या निवासस्थानात राहण्यास तयार नाहीत. शहरात किरायाने खोली घेऊन हे पोलीस ‌आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.

आमच्या प्रतिनिधीने बुधवारी पोलीस कॉलनीची पाहणी केली असता, ही बाब उघडकीस आली. सर्वच काॅलनीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. काही निवासस्थानांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसले. येथे कोणीही राहत नसल्याने ही निवासस्थाने निकामी झाली आहे. याकडे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

ना पाणी ना रस्ते

पोलीस कॉलनीतील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहेत. काही रस्त्यांची तर कामेच झाली नसल्याने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. येथील एका महिलेने सांगितले की, आम्हाला १० ते १५ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. तर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे तिने सांगितले.

किरायासाठी मिळतात केवळ १९०० रूपये

जे पोलीस कर्मचारी किरायाने राहतात. त्यांना शासनातर्फे किराया दिला जातो. सुरूवातीस एका पोलीस कर्मचाऱ्याला १५०० रूपये मिळायचे. आता १९०० रूपये मिळत आहे. सध्या एका खोलीसाठी तीन ते साडेतीन हजार रूपये किराया द्यावा लागतो. त्यामुळे शासनाकडून मिळालेला किराया हा अत्यल्प आहे.

काहींनी स्वखर्चातून केली डागडुजी

जे अधिकारी व कर्मचारी पोलीस निवासस्थानात राहतात. त्यांनी स्वत; हा खर्च करून डागडुजी केली आहे. याबाबत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, मी पोलीस कॉलनीत राहतो. माझ्या घराच्या खिडक्या तुटल्या होत्या. याबाबत मी अनेकवेळा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी स्वतच खिडक्याची दुरूस्ती केली.

चौकट

जिल्ह्यातील बहुतांश पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहेत. याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देखील पाठविला आहे. परंतु, अद्याप त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळताच कामाला सुरूवात करू.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना

जिल्ह्यातील एकूण निवासस्थाने

१००१

दुरवस्था झालेली निवासस्थाने

१८७

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या

१६३०

निवासस्थानात राहत असलेल्या पोलिसांची संख्या

४००