परतूर : तालुक्यातील रेवलगाव येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. सोहळ्यानिमित्त दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
रेवलगाव येथे मंगळवारी श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला आहे. ही कथा दैनंदिन दुपारी १२ ते ४ दरम्यान भागवताचार्य १०८ स्वामी परमेश्वर यती हे सांगत आहेत. तसेच दररोज रात्री कीर्तन सोहळ्याचेही आयोजन केले जात आहे. यामध्ये गोविंद महाराज कदम, हभप महामंडलेश्वर मनीषानंद महाराज, हभप सारंगधर महाराज रवळगावकर, हभप उमेश महाराज दशरथे, माउली महाराज राऊत, हभप वेदांताचार्य गणेश महाराज कोल्हे, हभप विनोद मूर्ती अमृत महाराज जोशी, हभप रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर यांची कीर्तने होणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.