जालना : राष्ट्रीय पक्षांसाठी राखीव ठेवलेल्या चिन्हांव्यतिरिक्त नारळापासून ते शस्त्रापर्यंत असे विविध प्रकारचे चिन्हे निवडणूक विभागाने अपक्षांना वितरीत केली आहेत. दरम्यान, यात दैनंदिन वापरातल्या वस्तुंसोबतच फळभाज्या व काही शस्त्रांचाही चिन्हांमध्ये समावेश असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे अधिकारी राजेश जोशी यांनी दिली.जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया बुधवारी पार पडली. पाठोपाठ आयोगाने उमेदवारास निवडणूक चिन्हेही वितरीत केली. प्रमुख राजकीय पक्षासाठी राखीव ठेवलेल्या चिन्हाबरोबरच अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह जारी करण्यात आले आहेत. त्या संबंधीची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयावर फलकावरही डकविण्यात आली.प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्षांना आरक्षीत चिन्हे वितरित करण्यात आली आहेत. भोकरदनमधून कॉँग्रेसचे बंंडखोर एल. के. दळवी यांना कपबशी, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार शफीकखॉ पठाण यांना अॉटोरिक्षा हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले आहे. किसन बोर्डे यांना अंगठी, प्रकाश सूरडकर यांना भाला, दिपक बोर्डे यांना बॅटरी, महादेव सूरडकर यांना बॅट, शंकर क्षीरसागर यांना दूरध्वनी संच, मिलिंद दिघे यांना कोट, विलास बोर्डे यांना ग्लास, बाबासाहेब शिंदे यांना फलंदाज, काशिनाथ सावंत यांना शिलाई मशिन, अॅड. फकीरा सिरसाठ यांना प्रेशर कुकर, परतूरमधून निवास चव्हाण यांना टीव्ही संच, बदनापूरमधून अरुण जाधव यांना खाट, तुकाराम हिवराळे यांना कपबशी, ईश्वर बिल्होरे यांना नारळ, जालनामधून बळीराम कोलते यांना खटारा, खालेद बिन नासेर चाऊस यांना कपबशी, धनसिंग सूर्यवंशी यांना नारळ, फिरोजखान समदखान यांना गॅस सिलेंडर, संदीप खरात यांना मेणबत्ती, सुदाम बनसोडे यांना खाट, कैलास घोरपडे यांना गॅस शेगडी, फारुख इलाईखान यांना शिवणयंत्र, दादाराव लहाने यांना प्रेशर कुकर तर ज्ञानेश्वर नाडे यांना तुतारी, अॅड. ज्ञानेश्वर वाघ यांना शिट्टी ही चिन्हे वितरीत करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
निवडणूक चिन्हांत नारळापासून शस्त्रेही
By admin | Updated: October 3, 2014 00:31 IST