शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीला उद्योगांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:13 IST

जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई, पुणे परिसरात उद्योग उभारणीला आता जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी औरंगाबाद, जालना येथे उद्योग उभारणीला प्राधान्य दिले होते. मात्र आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. या परिसरात २२० केव्हीचे वीज उपकेंद्र तसेच जलवाहीनी आणि रस्ते तसेच पथदिवे बसविले आहेत. तसेच या भागातील भूखंडाचे वितरण हे यापूर्वीच लिलाव पध्दतीने झाले आहे. असे असताना अनेकांनी येथे उद्योग उभारणीसाठी भूखंड खरेदी केले आहेत, मात्र प्रत्यक्षात उद्योग उभारणीसाठी अद्याप गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.जालना येथे या औद्योगिक विकासाच्या तिसऱ्याटप्प्यामुळे पूर्वीच्या दोन टप्प्यातील उद्योगांनी त्यांचा विस्तार करण्यासाठी येथे भूखंड घेतले आहेत. परंतु सध्या मंदीचे वातावरण असल्याने येथे स्थानिक उद्योजक गुंतवणुकीचे धाडस करत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुंबई, पुणे येथील उद्योजकांनी देखील येथे येणे टाळले असून, त्यांचा भर हा औरंगाबाद येथील दिल्ली ते मुंबई कॉरिडोरमध्ये जागा मिळावी हा हेतू असल्याने जालन्यात एकही मोठा उद्योग गेल्या पाच वर्षात आलेले नाही.जालना शहरातील औद्योगिक वसहातीत दोन आणि जालना तालुक्यातीलच रामनगर येथे आणखी एक ७० कोटी रूपयांचे २२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे जालन्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. या केंद्रामुळे उद्योगांना हवा तेवढा वीजपुरवठा मिळू शकतोे. तसेच या केंद्रातून आता काही स्टील उद्योजकांनी त्यांच्या कंपनीजवळ १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारली असून, थेट २२० केंद्रातून येथे वीज वाहून नेली जात आहे. मध्यंतरी जालन्यातील २२० उपकेंद्र थेट अकोला जिल्ह्यातील खापरखेडा येथील वीज निर्मिती केंद्राशी जोडण्याचा प्रस्ताव होता.

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसी