शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:25 IST

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यानिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली

लोकमत न्यूज नेटवर्क । जालना । जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान होत आहे. यानिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, परतीच्या पावसाचा व्यत्यय मतदानावर पडणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघात ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रावर सीआरपीएफ सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. एकूण ३८ संवेदनशील मतदान केंद्र असून, या सर्व केंद्रांवर प्रत्येक घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. मतदान करताना कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता सक्षमपणे मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.कडेकोट बंदोबस्त१४३७ स्थानिक पोलीस, १११६ होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, औरंगाबाद, मुंबई व नाशिक येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस बळ, रेल्वे पोलिसही मदतीला, जिल्ह्यात सर्वत्र रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी.मतदार यादीत विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचेअसेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ,नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिककेल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.कशी मिळवू शकतामतदान केंद्राची माहिती?मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही संकेतस्थळावर आहे.मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का ?सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.मतदारांसाठी २२८३ व्हीव्हीपॅटविधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार २८९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.कुठे काही गडबड झाली तर काय ?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि संबंधितांवर कडक कारवाई करेल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत एसपी (पोलीस अधीक्षक) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४६१ व्हीव्हीपॅट, ३०० कंट्रोल युनिट तर ४५२ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवापासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगGovernmentसरकार