शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता व गुणनियंत्रक विभागाची तपासणी संशयाच्या फे-यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:19 IST

राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे, तर दुसरीकडे संबंधित अपूर्ण कामांची बिले काढण्यात आलेली नाहीत. याची तपासणी झाल्यानंतरच ती काढली जातील, असे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. देवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या कामांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.शहरातील काही भागांत निजामकालीन सिमेंट रस्ते आजही आढळून येतात. ९० ते शंभर वर्षांनंतरही हे रस्ते सुस्थितीत आहेत. परंतु आजकाल शहरातील इतर झालेले डांबराचे रस्ते सहा महिनेही टिकत नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.एकाच रस्त्याचे दर सहा महिन्यांनी नव्याने डांबरीकरण केले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यांचे आयुष्य वाढावे व ते दीर्घकालीन टिकावे यासाठी यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय खा. रावसाहेब दानवे यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र, या कामांच्या मूळ उद्देशालाच हारताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. एक वर्षांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण व इतर कामे रखडली आहेत.अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक वा एम-४० पद्धतीची कामे अपेक्षित असताना ती झालेली नाही. नागरिकांतून ओरड झाल्यानंतर यावर थातूरमातूर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले.विशेष म्हणजे काँक्रिटीकरण झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचा दर्जा व वापरण्यात आलेल्या साहित्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याचे समजते. या पथकाच्याही ही बाब निदर्शनास आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पथकाने बारकाईने साहित्याची तपासणी व कामांचा दर्जा तपासला गेला असता तर तात्काळ हीच कामे पुन्हा दर्जेदार केली गेली असती. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राज्य शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी विनियोग चांगल्या प्रकारे होऊ शकलेला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा विकास होणार नाही, तर तो निधी योग्य प्रकारे खर्च होतोय की नाही, यावरही लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.