शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुली उद्दिष्टपूर्तीचा डोंगर तसाच उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:44 IST

जालना नगर पालिकेची शहरातील मालमत्ता व नळपट्टीपोटी २२ कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास ४० टक्के वसुली झाली असून, ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुलीचे आव्हान मालमत्ता, कर वसुली विभागावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेची शहरातील मालमत्ता व नळपट्टीपोटी २२ कोटींची थकबाकी आहे. त्यातील जवळपास ४० टक्के वसुली झाली असून, ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुलीचे आव्हान मालमत्ता, कर वसुली विभागावर आहे. विविध उपक्रम राबवून ही वसुली पालिकेच्या पथकाला करावी लागणार आहे. तरीही अवघ्या पंधरा दिवसांत उद्दिष्टपूर्वी होईल का, याबाबत साशंकताच आहे.जालना शहरात एकूण ६० हजार मालमत्ता असून, मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकलेला आहे. नळपट्टीचेही तेच आहे. या थकबाकीमुळे शहर विकासाला खीळ बसलेली आहे. अलिकडे शासनाच्या दबावामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी कडक धोरण राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला असून, पथकांवर जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत झालेल्या वसुलीचा आकडा पाहता विहित मुदतीत सदर उद्दिष्ट पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. वसुली शंभर टक्के न करणा-यांवर कडक कारवाईचे संकेत यापूर्वीच मिळालेले असले तरी पथकातील अधिका-यांवर त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. राज्याच्या नगरविकास खात्याने कर वसुलीचा आढावा घेण्याचे काम सुरु केलेले आहे, ज्या पालिका मालमत्ता कर वसूल करणार नाहीत, त्यांच्या विकास निधीला कात्री लावली जाईल, असे संकेत यापूर्वीच दिले केलेले असल्याने अधिकारी कामाला लागलेले आहेत.तर १ कोटींच्या निधीवर पाणी फिरणारजालना नगर परिषदेच्या वसुली पथकाला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. संबंधितांनी त्याची पूर्तता केली नाही तर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. प्रशासकीयस्तरावर कर वसुलीसाठी सर्वते प्रयत्न केले जात असले तरी त्यातून ८० टक्के कर वसुली होईल का, असा प्रश्न आहे.जालना नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली आजमितीस ४० टक्क्यांवर आलेली आहे. मार्चएण्डपर्यंत उर्वरित म्हणजेच उद्दिष्टासाठीची ४० टक्के वसुली होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. जर का कर वसुलीचा आकडा ८० टक्क्यांपर्यंत गेला नाही तर पालिकेला मिळणाºया १ कोटी रुपयांच्या विकास निधीवर पाणी फिरेल, हे मात्र निश्चित.