वणी : पाण्याचे दुर्भिक्ष व भाजीपाला उत्पादन यावर झालेल्या परिणामामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात अनपेक्षीत वाढ झाल्याने गृहीणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले आहे.सध्या मिरची, वाटाणा, दोडके, वांगे, भेंडी, गवार, कोबी, याबरोबर कोथींबीर मेथी तसेच इतर पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी घटली असुन भाजीपाला उत्पादित होण्यात प्रतिकुल परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट आल्याने बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने दरात वाढ झाल्याची माहीती भाजी विक्र ेते जगन लहीतकर यांनी दिली.दरम्यान सध्या नाशिकच्या बाजारसमितीत शहापुर येथुन मिरची कर्नाटक राज्यातुन कोबी व गुजरात राज्यातुन भेंडी घाऊक दरात विक्र ीसाठी येते. तसेच पाण्याची उपलब्धता ज्या भागात आहे अशा भागातुन उर्वरीत भाजीपाला विक्र ीसाठी बाजारसमितीत येतो व तेथुन किरकोळ भाजी विक्र ेते हा भाजीपाला खरेदी करु न आपापल्या स्थानिक बाजाराबरोबर आठवडे बाजारात त्याची विक्र ी करतात आशी माहीती त्यांनी दिली.दरम्यान उन्हाची तीव्रता भुजल पातळीत आलेली घट पिण्यासाठी पाणी गुरांना पाणी या समस्यांचे निराकारण कसे करावे हा प्रश्न उभा ठाकला असताना भाजीपाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध करणे जिकीरिचे असल्याने स्थानिक ठिकाणी स्वाभाविकपणे भाजीपाला उत्पादनावर याचा परीणाम झाल्याने महागडा भाजीपाला खरेदी करण्याची वेळ गृहीणी वर्गावर आली आहे.काही भाज्या ऐंशी रु पये किलो तर काहींनी शंभरी गाठल्याने तसेच कोथींबीर मेथीची भाजी व वेलवर्गीय भाज्याही महाग झाल्याने गृहीणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले असुन पावसाळा येईपर्यंत महागात भाजीपाला गृहीणी वर्गाला खरेदी करावा लागणार असल्याची माहीती देण्यात आली.
भाजीपाल्याचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:01 IST
वणी : पाण्याचे दुर्भिक्ष व भाजीपाला उत्पादन यावर झालेल्या परिणामामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात अनपेक्षीत वाढ झाल्याने गृहीणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले आहे.
भाजीपाल्याचे भाव कडाडले
ठळक मुद्देमहागडा भाजीपाला खरेदी करण्याची वेळ गृहीणी वर्गावर आली