शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:10 IST

बुधवारी जालना येथील बसस्थानकात आलेल्या चित्ररथाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एसटी महामंडळाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी राज्यातील १२ सुशिक्षित तरूणांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि ‘बस फॉर अस फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. बुधवारी जालना येथील बसस्थानकात आलेल्या या चित्ररथाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते.या चित्ररथाचे उद्घाटन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी झाडबुके, विभाग नियंत्रक यू. बी. वावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेव्हूल, जालना आगारप्रमुख पंडित चव्हाण, यंत्र अभियंता चालन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या चित्ररथाला दिवसभरात सरासरी तीन हजार प्रवाशांनी भेट देऊन मागील पाच वर्षात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी केलेल्या आमूलाग्र बदलाची माहिती जाणून घेतली.‘बस फॉर अस फाऊंडेशन’ हा एसटीवर नितांत प्रेम करणाऱ्या अशा १२ तरूणांचा समूह आहे. या गु्रपमधील तरूण अगदी लहानपणापासून एसटीवर प्रेम करत आहेत. एसटीचा स्पर्धेच्या युगात प्रचार व प्रसाह व्हावा, यासाठी एसटीला जगासमोर मांडण्यासाठी २०१६ मध्ये या तरूणांनी ‘एसटी विश्व’ या अनोख्या प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. यामध्ये १९४८ म्हणजे एसटी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत संपूर्ण इतिहास मांडला. सुरूवातीला बसस्थानकात भरणाºया प्रदर्शनातून यंदा प्रथमच ‘वारी लाल परीची’ ही अनोखी संकल्पना अंमलात आली आहे. यंदा राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५० शहरात ५० दिवसांमध्ये हा चित्ररथ फिरणार आहे. जालन्यातील या चित्ररथाचा बुधवारी ३८ वा दिवस होता. यासाठी ‘बस फॉर अस फाउंडेशन’चे सुमेघ देशभ्रतार, सय्यम धारव, रवि मळगे, सुशांत अवसरे यांनी पुढाकार घेतला आहे.एसटी महामंडळाचा आजवर झालेला प्रवास या अभियानात मांडण्यात आला आहे. या उपक्रमाला विभागीय कार्यालय व जालना बसस्थानकातील अधिकारी- पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.एसटी सेवा : आमूलाग्र बदलगेल्या काही वर्षांपासून एसटीच्या सेवेमध्ये अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत. यात शिवशाही सेवा, नवीन एम. एस. बांधणी, विठाई सेवा, रातराणी विनावातानुकूलित शयनयान सेवा, एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सेवा इ. सेवा सुविधांविषयी समज, गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या या अनोख्या ‘वारी लाल परीची’ या एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :state transportएसटीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकpaintingचित्रकला