शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:56 IST

गुलाबाची कळी जशी हळदीने माखली अशा एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणा-या वैशाली सामंत यांच्या गाण्यांवर सखी थिरकल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुलाबाची कळी जशी हळदीने माखली अशा एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणा-या वैशाली सामंत यांच्या गाण्यांवर सखी थिरकल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे.लोकमत सखी मंचने भारती लॉन्समध्ये आयोजित केलेल्या वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये संगीत आणि सूत्रसंचालन विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुजाता मुथा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, वितरणचे किशोर मरकड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात म्युझिक कॉन्सर्टला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनघा काळे आणि गौरव पवार यांनी गीते सदर केली. सुरुवातीला तीन ते चार गीते सादर झाल्यानंतर प्रेक्षकांमधूनच वैशाली सामंत यांची एण्ट्री झाली अन् सखी मंच सदस्यांनी एकच जल्लोष केला.वैशाली सामंत यांनी कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालाया लागली, चमचम करता है ये नशिला बदन, ऐका दाजिबा... इ. सादर केलेल्या गीतांमुळे वातावरण अधिकच संगीतमय बनले होते. प्रत्येक गाण्यावर सखींनी ठेका धरला. तर सैराट झालं जी आणि झिंग झिंग झिंगाट या गाण्यांवर तर अनेक सखींनी व्यासपीठावरच ठेका धरला. अभय गायकवाड यांनी सूत्रसंचालन करताना वापरलेली ग्रामीण ढंगाची भाषा शैली आणि चुटकुल्यांमुळे अधूनमधून सखींच्या चेह-यांवर हास्याची लकेर उमटली.