शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जागा ५०; अर्ज १० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:25 IST

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई पदाच्या ५० जागांसाठी दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई पदाच्या ५० जागांसाठी दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ९२० पैकी ५८१ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. उमेदवारांच्या धावण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी प्रथमच ‘ रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस’ चा (आरएफआयडी) वापर करण्यात आला.नोकरी मिळविण्याच्या वाढत्या स्पर्धेमुळे पोलीस भरतीकडे तरुणांचा कल वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिपाई पदाच्या मोजक्याच जागांसाठी आलेल्या हजारो अर्जांवरून याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अस्थापनेवरील केवळ ५० जागांसाठी दहा हजार २५० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये याकरिता पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे दिवसभर मैदानावर हजर होते. सोमवारी पहिल्या दिवशी ९२० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. पैकी ५८० उमेदवार प्रत्यक्षात हजर राहिले. प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. शारीरिक मोजमाप झाल्यानंतर उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी सकाळीच धावण्याची चाचणी घेण्यात आली. यासाठी प्रथमच १६०० मीटर व १०० मीटर धावण्याची अचूक वेळ नोंदविण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिव्हाईसचा वापर करण्यात आला. पुलअ‍ॅप्स, उंचउडी, लांब उडी, गोळाफेक इ. चाचण्या घेण्यात आल्या. उमेदवारांना गुणदान पद्धत माहिती व्हावी यासाठी प्रत्येक मैदानी चाचणीला कशाप्रमाणे गुण देण्यात येतील हे दर्शविणारे फलकही मैदानावर लावण्यात आले. मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. उमेदवारांसाठी पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय सुविधाही मैदानावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.डिजिटल साधनांचा वापरपोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मानवी हस्तक्षेप कमी करत डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणी भरती प्रक्रियेसाठी पैसे मागत असेल तर उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक जालना.