शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर-दुचाकी अपघातात दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 17:14 IST

अपघातानंतर ट्रेलर रस्ता दुभाजकावर चढला

बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील दावलवाडी पाटीजवळ दुपारी अडीज वाजता ट्रेलरच्या धडकेने दुचाकीवरील दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला. वैभव दत्ता चव्हाण (18 ) आणि आकाश सारंगधर जाधव (21 ) असे मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना-औरंगाबाद रोडवर दावलवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जालन्याहून औरंगाबादकडे एक ट्रेलर ( क्रमांक एम एच 21 बी एच - 3316 ) जात होता. याच दरम्यान वैभव चव्हाण आणि आक्श जाधव हे दोघे मोटरसायकलवर ( क्रमांक एम एच 21 बी सी 0560 ) जात होते. ट्रेलरसोबत त्यांची धडक झाली. भरधाव ट्रेलर खाली आल्याने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे होऊन मांस आणि रक्ताने रस्ता माखला होता. तर दुसरीकडे ट्रेलर रस्ता दुभाजकावर चढले. 

अपघाताची माहिती मिळताच पो.नि. मारुती खडेकर, पोहेकॉ गजानन जारवाल, एस. एस. भगत, शिवाजी काळूसे, बुणगे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दोन्ही युवकांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दावलवाडी पाटीजवळ मोठी वाहने नेहमीच जास्त वेगाने जातात त्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यावर प्रशासनाने उपयायोजना करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत जगताप यांनी केली. 

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना