लक्ष्मण आबाजी लव्हाळे (४५ रा. उंबरखेडा ता. भोकरदन) असे मयताचे नाव आहे. उंबरखेडा येथील लक्ष्मण लव्हाळे हे जालना शहरातील बाजारपेठेत तूर विक्री करून दुचाकीवरून (एम.एच.२१- ए.एल. ३९२३) गुरूवारी रात्रीच्या सुमारास गावाकडे चालले होते. खामखेडा पाटीजवळ गत चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या वाहनाला (क्रमांक एम.एच.२१- बी.एच. ७०७०) दुचाकीची धडक झाली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने लव्हाळे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह सहायक फौजदार शिवाजी देशमुख, राजू वाघमारे, गणेश मान्टे, संतोष वाढेकर, सिध्दार्थ साबळे यांनी घटनास्थळी भेट देवून जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. राजूर परिसरात एकाच आठवड्यात उभ्या वाहनाला धडकून दोन दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. मयत दुचाकीस्वाराच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
(फोटो मयत- लक्ष्मण लव्हाळे- 25जेएनपीएच 01)
===Photopath===
251220\25jan_1_25122020_15.jpg
===Caption===
(फोटो मयत- लक्ष्मण लव्हाळे- 25जेएनपीएच 01)