शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मराठा क्रांती भवनाला भेट दिली. यावेळी मराठा सेवा संघाचे विक्रम सोनोने उपस्थित होते. मराठा क्रांती भवनाच्या समन्वयकांच्या वतीने उभयतांचा वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक मुलींचे शिक्षण याच कारणामुळे बंद करण्याची वेळ गरीब, शेतकरी कुटुंबातील पालकांवर येते. अशा, गरजू मुला-मुलींसाठी सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, ग्रंथालय, अभ्यासिका या ठिकाणी उभारली जाणार असल्याने समाजाला शिक्षित आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी वास्तू म्हणून भविष्यात या क्रांती भवनाचा उल्लेख केला जाईल. ज्यांच्यात देण्याची दानत आहे, त्यांनी स्वतःहून या ऐतिहासिक कार्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे मत ॲण्ड. अंभुरे यांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती भवनासाठी दोन लाखांची फरशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST