शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘नायजेरियन फ्रॉड’ करणारे दोघे गुन्हे शाखेने उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:37 IST

ओ.एल.एक्स. या संकेतस्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाईन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा ‘नायजेरियन फ्रॉड’चा प्र्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

जालना : ओ.एल.एक्स. या संकेतस्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाईन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा ‘नायजेरियन फ्रॉड’चा प्र्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.मुरसलीम फजरू खान (२३, रा.घोघोर, भरतपूर, राजस्थान) व सद्दाम खान कासू खान (२३,झेंजपुरी, भरतपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जालना पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी अभिषेक शिरगुळे याने ओ.एल.एक्स या संकेतस्थळावर आयफोन खरेदी केला होता. मोबाईल विक्री करणा-यास त्यांनी पेटीएमद्वारे साडेबारा हजार रुपये दिले होते. विक्री करणा-याने शिरगुळे यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांचे शासकीय ओळखपत्र व आधारकार्ड व्हॉट्सअ‍ॅपवर मागवून घेतले. पैसे देऊनही मोबाईल मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क केला असता, त्याने मोबाईल पाठविल्याचे सांगितले. शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्या आधारे ओएलएक्सवर बनावट जाहिरात दिली. त्यामुळे शिरगुळे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वस्तू मिळाली नसल्याबाबत फोन आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार सायबर सेल तथा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सांगितला. सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला. तपासात संशयितांची सर्व माहिती मिळविल्यानंतर शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्याआधारे इतरांची फसवणूक झाल्याचे समोर आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावी सायबर सेलचे पथक पाठविण्यात आले. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर पथकाने झेंजपुरी येथे काही दिवस थांबून गुप्तपणे माहिती मिळवली. पाच फेबु्रवारीला पोलिसांनी दोघांना उचलून जालन्यात आणले. चौकशीत त्यांनी अशाच पद्धतीने इतर राज्यांतही अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, दहा सीमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी बी.डी. बोरसे, हेड कॉन्स्टेबल भालचंद्र गिरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश गोफणे, शिवप्रसाद एखंडे, शेख इरफान शेख, योगेश सहाणे, संगीता चव्हाण, अर्चना आधे यांनी ही कारवाई केली.------------नायजेरियन अधिक सक्रियपोलीस रेकॉर्डनुसार अशा पद्धतीने आॅनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार नायजेरियासह इराणी हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे अशा फसवणुकीस नायजेरियन फ्रॉड म्हटले जाते, असे पोलीस निरीक्षक गौर यांनी सांगितले.