शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:06 IST

महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील पाच विभागांत नवीन पद्धतीचे १६ हजार फ्लॅश मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे या मीटरद्वारे अधिकचे वीजबिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत

जालना : महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील पाच विभागांत नवीन पद्धतीचे १६ हजार फ्लॅश मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे या मीटरद्वारे अधिकचे वीजबिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. विशेष म्हणजे यातील सुमारे पावणेतीनशे मीटर विशिष्ट प्रकारच्या रिमोटमुळे बंद होत असल्याचे समोर आले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून हे उघडकीस आले आहे. महावितरणने वर्षभरापूर्वी जालना शहरासह जालना ग्रामीण, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर उपविभागात १६ हजार ३७५ नवीन पद्धतीने फ्लॅश मीटर बसविले होते. वीज युनिटच्या अचूक नोंदीसाठी हे मीटर उपयुक्त असल्याचे बसविताना सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या मीटरबाबत ग्राहकांमधून तक्रारी यायला सुरुवात झाली. मीटर बंद पडणे, विजेचा वापर सुरू असताना अधिकच्या रीडिंंगची नोंद होणे या प्रकारांमुळे ग्राहकांचे वीजबिल कमी होण्याऐवजी वाढत असल्याच्या अनेक तक्रारी महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. या फॉल्टी मीटरमुळे अनेक ग्राहकांना सरासरी वापराचे वीजबिल दिले जात आहे. जालना शहर व ग्रामीण उपविभागात बसविलेल्या अकरा हजार ८४७ पैकी ३९८ मीटरमध्येतांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी २४६ मीटरला विशिष्ट पद्धतीच्या रिमोटने चालू व बंद करून वीजबिलात चोरी केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अन्य उपविभागांत बसविण्यात आलेल्या फ्लॅशमीटरबाबत अनेक तक्रारी येत आहेत. भोकरदन, बदनापूर आणि जाफराबाद उपविभागातील अनुक्रमे ४७, १७ व १८ मीटरबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर एकूण २८३ मीटरमध्ये रिमोटच्या माध्यमातून तांत्रिक छेडछाड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीजग्राहक आणि महावितरणमध्ये वीज बिलावरून वाद निर्माण झाल्याने वीजबिलाच्या आठ प्रकरणांमध्ये ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये सुनावणी सुरू आहे. एकंदरीतच चांगल्या सुविधेसाठी बसविण्यात आलेले फ्लॅश मीटरमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे.--------------फ्लॅशमीटरबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने आता अशा पद्धतीचे मीटर बसविणे बंद करण्यात आले आहे. तसेच बसविण्यात आलेले बहुतांश मीटर बदलून देण्यात येत आहेत.- अशोक हुमणे, अधीक्षक अभियंता, महावितरण.