शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेला मुलीप्रमाणे वागविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:54 IST

घरात येणा-या सुनेला सासरकडील व्यक्तींनी आपल्या मुलीप्रमाणे वागवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी नगरपालिका क्रीडा संकुलाच्या मैदानावर अस्मिता सॅनिटरी नॅपकीन विक्री योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरात येणा-या सुनेला सासरकडील व्यक्तींनी आपल्या मुलीप्रमाणे वागवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी नगरपालिका क्रीडा संकुलाच्या मैदानावर अस्मिता सॅनिटरी नॅपकीन विक्री योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, सभापती जिजाबाई कळंबे, सुमनबाई घुगे, ग्रामीण विकास यंत्रणेचे सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी पी. बी. खपले महिला व बालविकास अधिकारी संगीता लोंढे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.खोतकर म्हणाले, की मुलगा किंवा मुलगी यांच्यात भेदवान न करता मुलीच्या जन्माचे प्रत्येक कुटुंबाने स्वागत करावे. ग्रामीण भागात आजही लग्न सोहळ्यांमध्ये महिलांचे मानपान नाट्य रंगतात. यावरून घरात येणा-या सुनेला सासूकडून त्रास देण्याच्या घटनाही घडतात. परंतु महिलांनी मनाचा मोठेपणा दाखवून सुनेला चांगले वागावे. आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना गंभीर आजार जडतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत तपासणी करून आवश्यक उपचारासाठी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष टोपे म्हणाले, की आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर कामे करत आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव करू नये. अन्य मान्यवरांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा शुभारंभ मान्यरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटांच्या महिला, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.