निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी हे प्रशिक्षण दिले. निवडणुकीसाठी १० झोन क्षेत्रीय अधिकारी आणि १५ निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील ५० ग्रामपंचायतसाठी एकूण ४१८ उमेदवार निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण १५६ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकी संदर्भात एकूण तीन प्रशिक्षण होणार आहे. दुसरे प्रशिक्षण ७ जानेवारी तर तिसरे प्रशिक्षण १४ जानेवारी रोजी दिले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी दिली. मंठा तालुक्यात होत असलेल्या ५० ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शिवाय निवडणुकी संदर्भातील सर्व प्रशिक्षणे, इव्हीएम मशिनची पूर्तता, वाहतुक आराखडा, वाहन अधिग्रहण आणि आवश्यक असलेले मनुष्यबळ इ. प्रशासकीय तय्यारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार घोबाळे व गणेश खराबे यांनी दिली.