याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा व्यापारी संघटना तसेच चेंबर ऑफ मराठवाडा आणि उद्योजकांच्या जवळपास सर्व संघटनांनी एकत्रित येत २६ फेब्रुवारीला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये जालना जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. या जीएसटी कायद्याच्या माध्यमातून सरकार पुन्हा एकदा इन्स्पेक्टर राज आणू इच्छित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जालना जिल्हा आणि शहरातील व्यापारी, उद्योजकांना गेल्या वर्षभरापासून जीएसटी तसेच सीजीएसटी विभागाने हेतूपुरस्सर त्रास दिल्याचा आरोप होत आहे.
तसेच एमआयडीसीतील स्टील उद्योजकांवरील छापे असोत की, ई-वे बिलांची तपासणी तसेच अन्य कारणे पुढे करून व्यापारी, उद्योजकांना हैराण केले आहे. यामुळे जालना जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळेल असा दावा जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे प्रभारी अध्यक्ष विनित साहनी, ग्रामीणचे अध्यक्ष हस्तीमल बंब, जालना शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निवेदनावर महासचिव संजय दाड, संघटन प्रमुख राजेश राऊत, सचिव श्याम लोया, सुभाष देविदान, बंकट खंडेलवाल, अर्जुन गेही, विजय राठी, पुरूषोत्तम जयपुरीया, बिजय बगडीया, राजेश कामड, विजयराज सुराणा, डॉ. संजय रूईखेडकर यांचा समावेश आहे.