शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘तोतलांनी तो भूखंड दर्गा परत करावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:08 IST

तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील शेरसवार दर्गाची सर्व्हे क्रमांक १०२, १०३ मधील जमीन ही सत्यनारायण तोतलांना साधारणपणे १९७२ मध्ये पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर दिली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात सत्तनारायण तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.जालन्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही दर्गा शेरसवारची जमिन १९७२ मध्ये तोतला परिवाराने पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतली होती. मध्यंतरी या जमिनीचे भूभाडे देखील त्यांनी दिले नाही. तसेच ज्या उद्देशासाठी ही जमिन भाडे तत्वावर घेतली होती. त्या व्यतिरिक्त तेथे ढाबा चालविणे, हातपंप खोदून पाण्याची विक्री करणे तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी भाड्याने देणे आदी आरोप सैय्यद जमील यांनी न्याय प्राधिकारणात तोतलांच्या विरूध्द दाखल दाव्यात केले आहेत. यावर औरंबादेतील न्याय प्राधिकरणमध्ये तीन न्यायाधींच्या बोर्डा समोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर प्राधिकरणने तोतला यांनी भाडे कराराचे उल्लंघन केल्याचा निर्णय दिला. तसेच ही जमिन दर्ग्याला परत देण्याचे निर्देशही तोतलांना दिले. या प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान सैय्यद जमील मौलाना हे शेर सवार दर्गाचे अधिकृत मुतवली नसल्याचा आरोपही तोतला यांनी यापूर्वी केला होता. त्यातच मध्यंतरी वक्फ बोर्डाने देखील मौलाना जमील हे मुतावली नसल्याचे मान्य करून त्यांच्या विरूध्द सदरबाजार पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.यावेळी मौलाना जमील यांना अधिकार नसतांना त्यांनी दर्गाची मोक्याची जमिन अनेकांना भाडेतत्वार करून दिल्याचे तक्रारीत म््हटले होते. यावरून त्यांना अटक होऊन कोठडीही मिळाली होती.निर्णयाला आव्हान देणारआम्ही कुठलेही कराराचे उल्लंघन केलेले नाही. चुकीच्या पध्दतीने आमच्यावर आरोप ठेवून आम्हाला बदनाम केले जात आहे. परंतु वास्तव परिस्थिती वेगळी आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या न्यायिक प्रकरणात मौलाना सैय्यद जमील यांच्या विरोधात निकाल गेले आहेत. परंतु आता वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाने जो निकाल दिला आहे. त्याचा आपण आमच्या वकीलामार्फत अभ्यास करणार आहोत. त्या नंतर या प्राधिकरणाच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.दरम्यान ३ फ्रेब्रवारी २०१६ मध्ये वक्फ बोर्डाकडून आम्हांला माहिती अधिकारा खाली जमील मौलना यांची मुतवली म्हणून नेकणूक केली नसल्याचे त्यात म्हटले होते. - सत्यनारायण तोतला, पेट्रोलपंपाचे मालक.

टॅग्स :Courtन्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे