शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात शौचालयाचे अनुदान घेऊन लाभार्थी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 21:12 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौ

ठळक मुद्दे१४१ जणांवर गुन्हे दाखल पालिकेच्या अधिका-यांना शौचालयांचा शोध

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालये बांधकाम अनुदानाचा हा गैरव्यवहार नऊ लाखांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना नगर पालिकेला शहरात १३ हजार २०० वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीचे उद्दिष्ट होते. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून १२ हजारांचे तर पालिकेकडून पाच हजारांचे, असे एकूण १७ हजारांचे अनुदान  निश्चित करण्यात आले. यासाठी स्वच्छतागृह नसलेल्या नागरिकांकडून वर्षभरापूर्वी अर्ज मागविण्यात आले.

निकषांची पूर्तता न करता प्राप्त अर्जांची  छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून बँक खात्यावर स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान जमा करण्यात आले होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम न करता अनुदान उचलल्याच्या तक्रारी आल्यांनतर पालिकेने पथक स्थापन करून अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांचा शोध सुरू केला.

शहरातील नूतनवसाहत, कन्हैयानगर, लालबाग,  इंदिरानगर, कैकाडी मोहल्ला, मंगळबाजार भागातील सुमारे पाचशेहून अधिक लाभार्थ्यांचा शोध या पथकाला लागला नाही. त्यामुळे नगर पालिकेने काही महिन्यांपूर्वी ४६७ जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापैकी काही लाभार्थ्यांचा शोध लागला. मात्र, १४१ लाभार्थ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

त्यामुळे या लाभार्थ्यांनी शासन अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन लागतोय पण दुस-याच जिल्ह्यातस्वच्छतागृहाचे अनुदान लाटणा-या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी नियुक्त पथक दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर अशा नावाची व्यक्ती या भागात राहत नसल्याचे आजूबाजूचे सांगत आहे अर्जावर दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तींना फोन लागत असल्याने शोध पथकातील कर्मचारी वैतागले आहेत.

स्वच्छतागृहांचे बांधकामही अपूर्णस्वच्छता अभियानांतर्गत जालना शहरात १३ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, दोन वेळा मूदतवाढ देऊनही हे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचे पालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांत नागरिक उघड्यावर शौचास जातात. स्वच्छता अभियानांतर्गत जालना शहराची केंद्रीय पथकाकडून होणारी तपासणीही अद्याप झालेली नाही.