शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वाटूर फाटा येथील बीअर बार फोडणारा चोरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

सदर बाजार पोलिसांची कारवाई : एक लाख ११ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा ...

सदर बाजार पोलिसांची कारवाई : एक लाख ११ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जालना : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील बीअरबार फोडून विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेणाऱ्यास सदर बाजार पोलिसांनी सोमवारी अटक केली. शेख आमेर शेख साबेर (२६, रा. शेरसवारनगर, जालना), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विदेशी दारूच्या बाटल्यांसह १ लाख ११ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील तोतला पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये एक व्यक्ती चढ्या भावाने दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. या माहितीवरून पोनि. देशमुख यांनी पथकाला पाठवून शेख आमेर शेख साबेर यास ताब्यात घेतले. पत्राच्या शेडची पाहणी केली असता, त्यात १७ विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. सदरील बॉक्स जप्त करून त्याला अधिक विचारपूस केली असता, त्याने भाऊ शेख आरेफ शेख साबेर याच्या मदतीने वाटूर फाटा येथील बीअरबार फोडून विदेशी दारूचे बॉक्स चोरून आणल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ११ हजार १८० रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, पोउपनि. रमेश रूपेकर, पोलीस अंमलदार समाधान तेलंग्रे, कैलास खार्डे, दीपक घुगे, फुलचंद गव्हाणे, अशोक जाधव, सुधीर वाघमारे, राजू वाघमारे, योगेश पठाडे, आगळे, वैशाली जावळे, सुमित्रा अंभोरे यांनी केली.