शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

चंदनझिरा येथे मोठा अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:22 IST

येथील सुंदरनगर भागात घरगुती सिलिंडरला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस केले नाही. मात्र, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे यांनी प्रसंगावधान राखत धाडस करून आग विझविली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : येथील सुंदरनगर भागात घरगुती सिलिंडरला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस केले नाही. मात्र, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे यांनी प्रसंगावधान राखत धाडस करून आग विझविली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.चंदनझिरा येथील सुंदरनगरमध्ये अशोक बोर्डे यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक घरातील सिलिंडरच्या रेग्युलेटरच्या बाजूला अचानक आग लागली. बघता बघता आग वाढतच गेली. बाजुलाच आणखी एक भरलेले सिलेंडर असल्याने व आग वाढत असल्याने आग विझविण्यास कोणीच पुढे येईना. या आगीमुळे बाजूच्या रूममध्ये काहीजण अडकून पडले. त्यांनाही आगीमुळे बाहेर येता येईना. स्वयंपाक घरातील साहित्यानेही पेट घेतला.याविषयी चंदनझिरा पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. येथील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे हे क्षणाचाही विलंब न करता ठाण्यातील अग्निशमन सिलेंडर घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोकॉ. जंधाळे यांच्या प्रसंगावधाने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी जंधाळे यांचे कौतुक केले.