शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर दुकानांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:58 IST

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.जिल्ह्यातील २ हजार ८०० व्यापाºयांनी अन्न औषधी प्रशासन विभागाकडून परवाने काढले आहेत. त्या व्यतिरिक्त १३ हजार ५१५ छोट्या व्यावसायीकांनी नोंदणी केली आहे. गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतांनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटख्यासह सुंगधी तंबाखुची विक्री राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे पानटपरी धारकच नाही तर अन्न पदार्थ विक्री करणारे मोठे दुकानदारही गुटखा विक्री करीत असल्याचे निर्दशनात आले आहे. जिल्ह्यात अनेक छोटे दुकानदार टप-यामध्ये तंबाखूसोबतच चॉकलेट चिप्स, टॉफी, बिस्कीट, शितपेय आदींची विक्री करतात .अशा ठिकाणी लहान मुलेही चॉकलेट, चिप्स आदीचे सेवन करतात. अशा प्रकारे गुटखाजन्य पदार्थांची विक्री केल्यास लहान मुलावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच अन्न सुरक्षा कायदा २००६ चे कलम ३१ कलमाचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे. ही बाब शासनाच्या निर्दशनात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी नुकतेच याबाबात आदेश काढून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार ज्या ठिकाणी अन्न पदार्थाची विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असेल, अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी. वेळ पडल्यास संबधीत दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा अन्न सुरक्षा विभागाला दिले आहे. यामुळे ज्या दुकानदाराकडे अन्न सुरक्षा परवाने आहेत, अशा दुकानदारांची आता नियमित तपासणी होणार असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.राज्यशासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे. मात्र याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने अल्पवयीन तरूण व्यसनाधीन होत आहेत. याकडे मात्र संबधीत विभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.