शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले

By संजय देशमुख  | Updated: November 18, 2022 13:41 IST

विजेची सबसिडी लांबणीवर : कर वगळता ४८ हजारांवर आले भाव

- संजय देशमुखजालना : तीन ते चार महिन्यांपूर्वी स्टीलच्या दरात आलेली तेजी हळूहळू उतरली असून, आजघडीला कर वगळता स्टीलचे दर ४८ हजारांवर आले आहेत. म्हणजेच २४ हजार रुपयांची विक्रमी घसरण झाल्याचे चित्र आहे. हे दर घसरण्यामागे घटलेली मागणी, राज्य सरकारकडून विजेची न मिळालेली सबसिडी, फ्युअल टॅक्स आणि इम्पोर्ट ड्युटी ही कारणे सांगितली जात आहेत.

विदर्भाप्रमाणेच जालन्यातील स्टील उद्योग संकटात सापडला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने मोठ्या शहरांमध्ये बांधकाम व्यवसाय झेप घेईल अशी चिन्हे होती; परंतु तसे झाले नाही. दसरा, दिवाळी झाल्यावर बांधकाम रिअल इस्टेटमध्ये तेजीचे संकेतही होते. परंतु, जी तयार घरे आहेत, त्यांनाच मागणी असल्याचे दिसते. नवीन मोठ्या प्रोजेक्टवर ज्या पद्धतीने गती घेणे अपेक्षित होते, ती गती घेतली नाही. याचा परिणाम घरबांधणीसाठी लागणाऱ्या स्टील अर्थात लोखंडी सळ्यांच्या उत्पादनावर झाला आहे. मोठी गुंतवणूक करून येथील स्टील उद्योजकांनी मागणीपूर्व काही टनांमध्ये उत्पादन करून त्याची साठवणूक केली होती. आज ना उद्या स्टीलला चांगले दिवस येतील असे वाटले होते; परंतु उद्योजकांच्या या आशेवर मागणीअभावी पाणी फेरले आहे.

या उद्योगाला चालना देण्यासाठी मध्यंतरी विदर्भ तसेच मराठवाड्यातील उद्योगांना विजेच्या दरात सबसिडी दिली होती. परंतु, ही सबसिडी अद्याप मिळाली नाही. त्यातच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन नवीन सरकार आले. या सरकारकडूनही पाहिजे ती दखल घेतली गेलेली नाही. विजेचे दर महाराष्ट्रात खूप अधिक आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राचे शेजारी असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हे दर चार ते पाच रुपयांनी प्रतियुनिट कमी आहेत. असेच दर जर महाराष्ट्रात मिळाले तर उत्पादनावरील खर्च कमी होऊन उद्योजकांना दिलासा मिळू शकतो. परंतु, वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे.

अनेकांनी घटवले उत्पादनस्टीलची घटलेली मागणी आणि घसरलेले विक्रमी दर यामुळे उद्योजक नियमितपणे जे उत्पादन घेत होते ते त्यांनी सरासरी २० ते २५ टक्के घटविले आहे. केलेल्या उत्पादनाचा साठा ठेवावा कुठे, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कमी झालेल्या दरातही आणखी काही डिस्काउंट करून मुद्दल काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व करांसहित तीन महिन्यांपूर्वी स्टीलचे दर हे थेट ९० हजार रुपये प्रतिटनावर पोहोचले होते. आज कर न आकारता मूळ दर हे थेट ७२ हजार रुपयांवरून चक्क ४८ हजार रुपये टनावर आल्याचे योगेश मानधनी (अध्यक्ष स्टील मॅन्युफॅक्चर असो. महाराष्ट्र) यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाbusinessव्यवसाय