शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयात बॉम्ब असल्याचा फोन धडकला अन् पोलिसांची धांदल उडाली

By दिपक ढोले  | Updated: September 21, 2023 22:12 IST

जालना : शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका रूग्णालयात बॉम्ब असल्याचा फोन डायल ११२ क्रमांकावर आला. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली. ...

जालना : शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका रूग्णालयात बॉम्ब असल्याचा फोन डायल ११२ क्रमांकावर आला. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह रूग्णालयाकडे धाव घेतली. तेथे तपासणी केली असता, काहीच आढळून आले नाही. ही घटना बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली, अशी माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली.

जालना शहरातील मंठा चौफुली येथे श्रीकृष्ण हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती एका व्यक्तीने डायल ११२ क्रमांकावर बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास दिली. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथकालाही बोलविण्यात आले होते. पथकाने रूग्णालयाचा प्रत्येक भाग तपासला. परंतु, काहीच सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन आला, त्याला परत फोन केला असता, त्याने फोन बंद केल्याचे दिसून आले. त्याचा शोध घेतला असता, तो संजय राठोड असल्याचे समजले. त्याच्याविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली.                                                                                                                                                       खोटी माहिती देऊ नका अन्यथा कारवाई होईल

सदरील व्यक्तीने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली आहे. त्याच्याविरुध्द आम्ही गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. अशा प्रकारे पोलिसांना खोटी माहिती देऊ नका, नाहीतर कडक कारवाई केली जाईल.

जनार्दन शेवाळे, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे