शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दहा हजाराची लाच स्वीकारताना कर अधिकारी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:19 IST

लाच लुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक केली आहे.

जालना : शहरातील सेवाकर कार्यालयातील राज्य कर अधिकाऱ्यास १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने आज अटक केली. प्रदिप सदाशिव देशमुख (३९, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, लाच लुचपत विभागाने या महिन्यातच ४ अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक केली आहे.

जालना शहरातील  तक्रारदाराने टॅक्स न भरल्याने कर अधिकारी देखमुख यांनी तक्रारदाराचे बँक खाते सिल करण्याबाबत बँकेला पत्र दिले.   त्यानंतर तक्रारदारांनी टॅक्स भरुन सीए मार्फेत पावत्या कर अधिकारी देशमुख यांना देवून सिल केलेले खाते रिलीज करण्याची विनंती केली. परंतु, देशमुख म्हणाले की, टॅक्स उशीराने भरल्यामुळे तक्रारदारास मोठ्या प्रमाणात दंड करण्याचे अधिकार असल्याचे सांगून १५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत सीए यांनी तक्रारदारास सांगितले.  त्यानंतर तक्रारदार यांनी देशमुख यांना फोन लावून विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदार यांना प्रत्यक्ष भेटण्यास बोलावले, पैसे दिल्याशिवा रिलीज करण्याचे पत्र देणार नसल्याचे कर अधिकारी देशमुख यांनी सांगितले.  

यानंतर तक्रारदारने लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारी वरुन मंगळवारी देशमुख यांच्या लाचेच्या मागणी पडताळणी केली असता, त्यांनी लाच स्विकारल्याचे निषन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकरी, अपर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक निकाळजे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.आ.वि. काशिद, पोनि. चव्हाण, कर्मचारी टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर यांनी केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारJalanaजालनाArrestअटक