शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या पावत्या देऊन लाखोंची कर चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:40 IST

येथील अनेक व्यापारी दुकानाचे नाव न लिहिता ग्राहकांना बिलाच्या कच्च्या पावत्या देवून सरकाच्या तिजोरीत जाणाऱ्या लाखो रुपयांच्या कराची चोरी करत आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बाजारात सिमेंट, स्टील, पत्रे, कृषी साहित्याच्या खरेदीतून दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मालमत्ता आणि सेवा कर अर्थात जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व विक्रेत्यांना ग्राहकांना जीएसटी क्रमांकाहस संगणकीकृत बिल देणे बंधनकारक आहेत. मात्र, येथील अनेक व्यापारी दुकानाचे नाव न लिहिता ग्राहकांना बिलाच्या कच्च्या पावत्या देवून सरकाच्या तिजोरीत जाणाऱ्या लाखो रुपयांच्या कराची चोरी करत आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे.व्यापारी शहर म्हणून जालन्याची ओळख आहे. येथील स्टील, बियाणे, डाळमिल, खाद्य तेलाच्या व्यवसायात दररोज कोट्यवधीचे व्यवहार होतात. मराठवाड्यात क्रमांक एकवर असलेल्या बाजार समितीमध्ये दररोज मोठी उलाढाल होते. सध्या शहरी भागात गृहप्रकल्पांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच ग्रामीण भागातही शहरातील घरांप्रमाणेच सिमेंटचे पक्के घर बांधण्यास पसंती दिली जात आहे. यासाठी बाजारात सिमेंट, स्टील, पत्रे, लोखंडी एँगल्ससह अन्य बांधकाम साहित्याला मोठी मागणी आहे. तसेच खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आवश्यक कृषी साहित्य खरेदीस प्राधान्य देत आहेत. मात्र, खरेदी-विक्रीच्या या व्यवहारात ग्राहकांना व्यापाºयांकडून जीएसटी क्रमांकासह पक्के बिल देण्यास पळवाटा शोधल्या जात आहेत.सिमेंट, स्टीलची खरेदी केल्यानंतर अनेक व्यापारी ग्राहकांना दुकानाचे नाव नसलेल्या साध्या कॅशमेमोवर दर, वजन व पैसे एवढेच नमूद करून कच्चे बिल देत आहेत. ग्राहकांनी मागितल्यानंतरही पक्के बिल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हस्तलिखित बिलाच्या व्यवहारातून सरकारच्या तिजोरीत जाणाºया लाखोंच्या कराची सर्रास चोरी केली जात आहे.किराणासह अन्य उत्पादनांची खरेदी करताना हाच प्रकार सुरू आहे. मेडीकलमध्ये औषधींची खरेदीनंतरही अनेकदा बिल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.भुर्दंड : तो खर्चही ग्राहकांच्या माथीबाजारात समितीमध्ये स्टील, सिमेंट, पत्रे, कृषी साहित्य, धान्य आदी कुठल्याही प्रकारच्या साहित्याचे वजन करून ग्राहकांना दिले जाते. मात्र, वजन काट्यावरील मापाचा खर्चही ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे. शिवाय हमालीच्या नावाखाली ग्राहकांकडून शंभर रुपयांपासून पाचशे रुपये वसुली केली जात आहे.

टॅग्स :businessव्यवसायTaxकर