शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

‘जेईई’ मध्ये तवरावालाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:46 AM

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे.यंदा ही परीक्षा २० मे रोजी प्रथमच आॅनलाइन पार पडली. अत्यंत क्लिष्ट अशा या परीक्षेत पार्थने जी रँक मिळवली आहे, ती जालना जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षात कोणत्याच विद्यार्थ्याने मिळवली नाही. पार्थचे प्राथमिक शिक्षण पोदार इंग्रजी शाळेत झाले. लहानपणीच त्याने आपल्याला आयआयटी करण्याचे ध्येय ठरवले होते, आणि त्या दृष्टीने त्याने तसे प्रयत्न केले. हैदाराबाद येथे राहून त्याने जेइई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची तयारी केली. यासाठी त्याला वडिल डॉ. मनोज तवरावाला, आई डॉ. अनिता तवरावाला यासह मोठी बहीण रक्षा तवरावाला यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पार्थने लोकमतशी बोलताना सांगितले.आयआयटी पवई येथे त्याला अ‍ॅडमिशन घ्यायचे आहे. यापूर्वी पार्थने एनटीएस तसेच के.व्ही.पी.वाय. या परीक्षेतही मोठी भरारी घेतली होती.जालन्यातील विद्यार्थ्यांनी नीट तसेच जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये मोठे यश मिळवून जालन्यातील मुलांची हुशारी सिध्द केल्याने त्यांचे मान्यवरांकडून स्वागत होत आहे.जेईई अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा युपीएससी नंतरची भारतातील अत्यंत प्रतिष्ठेची व तेवढीच अवघड आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते.सिध्देश बियाणीचे यशयेथील सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने देखील जेइई अ‍ॅडव्हान्समध्ये मोठी झेप घेतली असून, त्याल आॅलइंडिया रँक ८२९ मिळाली आहे. अपेक्षेपेक्षा चांगली रँक मिळाल्याचे त्याला समाधान असून, त्याला मुंबईतील आयआयटीमध्ये इकॉनॉमिक्स शाखेत भविष्य घडवायचे आहे. सिध्देशचे प्राथमिक शिक्षण येथील गोल्डन ज्युबिली शाळेत झाले आहे. या यशासाठी वडील, आई तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगून त्याने या परीक्षेची तयारी ही कोटा येथे केल्याचे तो म्हणाला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा