शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:25 IST

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न ...

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे पाहणी करण्यासाठी आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.यावेळी जोंधळे यांनी जालना जिल्हा हद्दीतील होत असलेल्या चौपदरीकरणाची पाहणी करून या महामार्गाचे काम करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कुणाच्या संपादित झालेल्या शेत जमीन व बांधकाम बाबतच्या समस्या लवकर सोडवा अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. चुकीच्या निवाड्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.सा. बां. विभागाने संबंधित जमीन व इमारती संपादित करीत असताना प्रत्यक्ष जाऊन मोजमाप न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याने शेतक-यांना मोबदला खूपच कमी मिळत असल्याची तक्रार आहे. जोंधळे यांनी या समस्या समजावून घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, महामार्ग प्रकल्प अधिकारी गाढेकर, तहसीलदार दत्ता भारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, आयआरबीचे अधिकारी धनराज परीट, एस. के. सावळकर, जनसंपर्क अधिकारी पाठक, २११ महामार्ग अन्याय कृती समितीचे तुकाराम वायाळ, बळीराम खटके, अजीम शेख, पंडित गावडे, विठ्ठल कोकणे, राजेंद्र तांदळे, आरेफ खान आदी उपस्थित होते.