हसनाबाद : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच सुरेश रामकिसन लाठी व उपसरपंचपदी वनिता कृष्णा खडेकर यांची बिनविरोध निवड झाली.
बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य टिकाराम मिमरोट, सुनिल सुरडकर, बाबासाहेब जोशी, संगिता पवार, पुजा मोरे, शेख जाकीर शेख शब्बीर, मनिषा रामफळे, सुनिल वाल्डे, जनार्दन खरात, शेख रुखसानाबी शेख करिम, निवडणूक अध्यासी अधिकारी दौलत विठोबा इंगळे, ग्रामविस्तार अधिकारी गणेश इरतकर, तलाठी शाहूराव कदम यांची उपस्थिती होती. विजयी उमेदवारांचे जि.प. सदस्य गणेश फुके, प.सं. सदस्य कैलास सहाणे, प्राचार्य माणिक दानवे, प्राचार्य अशोक लाठी, माजी सरपंच चंद्रकला कंगले, आनंद पवार, पप्पू जैस्वाल, राजेश कंगले, सतीश लड्डा, संतोष खडेकर, अस्लम बागवान, भानुदास खडेकर, सुभाष सुरडकर, दादाराव वाल्डे, गोपाळ सुरडकर, पुजाराम मैद, बाळू पुजारी, गणपत मैद, जनार्दन खरात, रमेश कुमावत, मदन लड्डा आदींची उपस्थिती होती.