शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:52 IST

औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील  दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

बदनापूर ( जालना ) : औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील  दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. हे प्रेमी युगुल बुधवारपासून (दि.14)  औरंगाबाद येथून बेपत्ता होते. 

औरंगाबाद येथील कोमल अशोक गरुड (१७) व शशांक सुभाष जैस्वाल (२१) या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते दोघे बुधवारी (दि.१४) व्हॅलेनटाईन डेच्या दिवशी कोणास काही माहिती न देता  घरातून निघून गेले होते. याबाबत कोमलच्या पालकांनी गुरुवारी (दि.१५) औरंगाबाद येथील सिटी चौक‍ पोलिस स्टेशनमध्ये शशांक याने कोमलचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती. 

दरम्यान, आज पहाटे दावलवाडी फाटयाजवळ मृत अवस्थेत अनोळखी युवक - युवतीचे प्रेत आढळून आले. मृतदेहा शेजारी विषारी द्रव्य मिश्रीत पिण्याच्या पाण्याची बॉटल आढळून आली. तसेच बाजूलाच एक चिट्ठी आढळून आली असून त्यात, 'आम्ही दोघे जण आत्महत्या करत असल्याचे' नमूद करण्यात आलेले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यानंतर हे युवक - युवती औरंगाबाद येथून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. यावरून बदनापूर पोलिसांनी सिटी चौक पोलिस स्टेशनला माहिती दिली. यानंतर कोमलचा भाऊ बदनापूर येथे आला असता त्याने मृतदेह कोमल व शशांक यांचा असल्याचे सांगितले. 

कोमल औरंगाबाद येथील एस. बी. महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. मुळची नांदगाव येथील असून औरंगाबाद येथे शिक्षणासाठी काकांकडे नारळीबाग येथे राहत असल्याची माहिती समजते. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश नळेगांवकर, बाबासाहेब गायकवाड, दिलीप जगदाळे यांनी भेट दिली. या बाबत बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.