शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्पार्किंगमुळे चार एकरातील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक झाला. अंबड तालुक्यातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे उसाला आग लागल्याची ही महिनाभरातील चौथी घटना असल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शिवाजीनगर येथील तुकाराम तुळशीराम आदमाने, सखाराम तुळशीराम आदमाने व पांंडुरंग जालिंदर आदमाने यांनी गहिनीनाथनगर शिवारातील गट क्रमांक चारमध्ये उसाची लागवड केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतक-यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा पाच हेक्टरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला, असे तुकाराम आदमाने यांनी सांगितले. लोंबकळलेल्या तारांसंदर्भात अनेकदा तक्रार करूनही महावितरणच्या अधिका-यांनी दखल न घेतल्यामुळे चार लाखांचे नुकसान झाले असे आदमाने यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महावितरणच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या महिन्यामध्ये विद्युत तारांमध्ये घर्षण ऊस जळाल्याच्या चार घटना घडल्या असून, शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.