दाभाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी कोरोना काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. विकास गटकळ, डॉ. निखिल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.के. लघुटे, एम. आर. तिडके, सोनवणे, वंदना निकम, कुशीवर्ता फलके आदींनी ही तपसणी मोहीम यशस्वी केली.
इब्राहीमपूर येथील सप्ताहाचा समारोप
भोकरदन : तालुक्यातील इब्राहीमपूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा हभप. विष्णू महाराज सास्ते यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला. सास्ते महाराज यांनी विविध दाखले देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. कीर्तनानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कीर्तन कार्यक्रमास परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.
बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी
बदनापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत आहेत. या डॉक्टरांकडून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असून, प्रशासनाने याची दखल घेसन तत्काळ बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन सुरासे, अर्जुन पठाडे, गणेश कोल्हे, अंबड तालुकाध्यक्ष किरण जोशी, दादा जगताप, राम मडके उपस्थित होते.