परतूर : शहरातील डाॅ. स्वप्नील बी मंत्री यांना उत्कृष्ट कोरोना वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंहजी कोश्यारी यांनी हा पुरस्कार त्यांना दिला. डॉ. मंत्री यांनी कोरोना काळात विविध उपक्रम राबविले होते.
पापळच्या उपसरपंचपदी बोबडे यांची निवड
जाफराबाद : तालुक्यातील पापळ येथील संगीता बोबडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी शे. कलीम यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सदरील पदासाठी निवड प्रक्रीया नुकतीच घेण्यात आली. दरम्यान संगीता बोबडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मराठवाडा अध्यक्षपदी गिराम यांची नियुक्ती
जालना : नाभिक सेवा संघाच्या कर्मचारी संघ मराठवाडा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माधव भाले यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा अध्यक्ष सेनाजी काळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. गिराम यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
अक्षय जोगदंड यांचे घवघवीत यश
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील अक्षय जोगदंड यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात अक्षय याने प्राप्त केलेले यश पाहून त्याचा गाव परिसरातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अक्षयने विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेले असल्याची माहिती ग्रामस्थांमधून देण्यात आली आहे.