शहागड : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मराठा आंदोलकांची चेष्टा करीत असून, याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा मोज जरांगे यांनी दिला. मंत्र्यांकडून सुरू असलेली मराठा आंदोलकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव येथे गत ३७ दिवसांपासून ठिय्या उपोषण सुरू आहे. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिलेले आहे. परंतु, त्यानंतर शासनाकडून आंदोलकांना कोणताही निर्णय सांगण्यात आलेला नाही. ही आंदोलकांची घोर फसवणूक आहे. मंत्र्यांकडून फसवणूक होत असल्याने समाजात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबतही गैरसमज निर्माण होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला उद्रेकाची धार मिळण्यापूर्वी शासनाने मराठा समाज बांधवांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी ७ मार्च रोजी राज्यातील लाखो मराठ्यांचा साष्टपिंपळगावात आरक्षण आक्रोश मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती आंदाेलकांनी दिली.
फोटो